Advertisement

इंदिरानगर, प्रभाग क्र. ३ येथे बहुजन समाज पार्टीची संघटनात्मक बैठक संपन्न

चंद्रपूर : बहुजन समाज पार्टी (बसपा) च्या वतीने इंदिरानगर, प्रभाग क्र. ३ येथे संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी संघटन विस्ताराच्या अनुषंगाने मा. सुमेधभाऊ हिरालालजी वाघमारे यांची इंदिरानगर सेक्टर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून आगामी काळात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सक्रियपणे कार्य करण्याच्या शुभेच्छा दिल्या.

बैठकीस मा. शंकरजी मेश्राम (बसपा चंद्रपूर विधानसभा महासचिव), मा. आनंदजी घोडणे (वरिष्ठ बसपा कार्यकर्ते), इंजि. विमित कोसे (शहर अध्यक्ष, बसपा चंद्रपूर) तसेच इंजि. शुभम सागोरे (शहर सचिव, बसपा चंद्रपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत आगामी संघटनात्मक उपक्रम, सदस्य नोंदणी, बूथस्तरावरील पक्षबांधणी तसेच बहुजन समाज पार्टीचे विचार अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

टीप : सदर वृत्त संबंधितांकडून प्राप्त झालेल्या प्रसिद्धीपत्रकाच्या आधारे प्रकाशित करण्यात आले आहे. या वृत्तातील माहिती, दावे व मते यांची स्वतंत्र पडताळणी The Patil News ने केलेली नाही. या वृत्ताच्या आशयाबाबतची जबाबदारी संबंधित माहिती पुरविणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेची राहील.