The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

डॉ. आंबेडकर महाविद्यालयातून जटपुरा गेटपर्यंत भव्य ‘अहिंसा दिंडी’ संपन्न.

News Image

चंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी संचलित डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ‘अहिंसा दिंडी’चे आयोजन करण्यात आले.

२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता महाविद्यालय परिसरातून या दिंडीला सुरुवात झाली. महाविद्यालयातून निघालेली अहिंसा दिंडी शहरातील मुख्य मार्गांवरून शिस्तबद्धरीत्या मार्गक्रमण करत ऐतिहासिक जटपुरा गेट येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली.

यावेळी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी हातात सत्य, अहिंसा, शांतता, बंधुभाव तसेच ‘स्वच्छ भारत’ आणि ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानांचे फलक घेतले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर घोषणाही दिल्या.

या अहिंसा दिंडीत महाविद्यालयाचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी, सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, NSS स्वयंसेवक व NCC कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टीप : सदर बातमी उपलब्ध माहितीनुसार व संबंधित कार्यक्रमाच्या तपशीलांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. बातमीतील माहिती ही प्राप्त माहितीनुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔डॉ. आंबेडकर महाविद्यालयातून जटपुरा गेटपर्यंत भव्य ‘अहिंसा दिंडी’ संपन्न.🔔रमाई बुद्ध विहार, इंदिरा नगर येथे प्रबोधन कार्यक्रम संपन्न.🔔ज्ञानसेवेच्या प्रदीर्घ पर्वाला विराम; तीन प्राध्यापकांचा सेवापूर्ती सोहळा.🔔शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने जिवती तालुक्यात ग्राम रोजगार सहाय्यकांचे १ ऑक्टोबरपासून 'कामबंद' आंदोलन.🔔अमृता फडणवीस यांच्या हस्ते १०० विद्यार्थिनींना सायकल वाटप.🔔राज्यातील सर्वात मोठ्या पुरातन महाशिवलिंगाला मिळाले भव्य मंदिररूपी छत्र.🔔देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहातील सेवाभावी उपक्रमांचा विशेष अल्बम मुख्यमंत्र्यांना सुपुर्द.🔔शासकीय रुग्णालयातील सुविधांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून ‘ऑन द स्पॉट’ आढावा; अस्वच्छता, एसी व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीवर नाराजी.