Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
दिनांक : २७/१०/२०२६
चंद्रपूर / वर्धा : बंधाऱ्याच्या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात ₹४०,०००/- ची लाच स्वीकारताना कोरपणा येथील कृषी सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), वर्धा पथकाने आज रंगेहात पकडले.
आरोपी लोकसेवकाची माहिती :
नाव : हरी विठ्ठलराव उदगीरे (वय ३५ वर्षे)
पद : कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कोरपणा, जि. चंद्रपूर
पत्ता : ह.मु. शिक्षक कॉलनी, गडचांदूर, जि. चंद्रपूर; मूळ रा. हनुमंत जवळगा, ता. चाकूर, जि. लातूर.
घटनेचा तपशील
या प्रकरणातील तक्रारदार (पुरुष, वय ४६ वर्षे) यांनी केलेल्या बंधाऱ्याच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी आलोसे हरी उदगीरे यांनी सुरुवातीला ₹५५,०००/- लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ₹४०,०००/- आज स्वीकारून उर्वरित रक्कम नंतर घेण्याचे आरोपीने मान्य केले.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीच्या आधारे आज दिनांक २७/१०/२०२६ रोजी शासकीय पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपी लोकसेवकाने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर रचण्यात आलेल्या सापळ्यात आरोपी हरी उदगीरे याने तक्रारदाराकडून तडजोडीअंती ठरलेली ₹४०,०००/- ची लाचेची रक्कम (५०० रुपयांच्या ८० नोटा) स्वीकारली असता, एसीबी पथकाने त्याला सायंकाळी १७:५५ वाजता रंगेहात ताब्यात घेतले.
जप्ती व पुढील कारवाई
आरोपीच्या अंगझडतीतून एक 'विव्हो' (Vivo) कंपनीचा मोबाईल फोन व ₹५९५/- रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून, याप्रकरणी पोलीस ठाणे गडचांदूर (जि. चंद्रपूर) येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. केदार, ला.प्र.वि. चंद्रपूर हे करीत आहेत.
सापळा कारवाई पथक
सदर यशस्वी सापळा कारवाई श्री. संदीप मुपडे (पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. वर्धा), पोलीस हवालदार मंगेश झामरे, सचिन गाडवे, पोलीस शिपाई प्रीतम इंगळे, लक्ष्मण केंद्रे व विष्णू काळुसे (सर्व ला.प्र.वि. घटक, वर्धा) यांनी पार पाडली.
जनतेस आवाहन
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्याने शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी तात्काळ संपर्क साधावा.
टीप : सदर बातमी प्राप्त माहितीनुसार तयार करण्यात आली आहे.
THE PATIL NEWS
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: