The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

रमाई बुद्ध विहार, इंदिरा नगर येथे प्रबोधन कार्यक्रम संपन्न.

News Image

चंद्रपूर : रमाई बुद्ध विहार, इंदिरा नगर येथे सामाजिक व संघटनात्मक विषयांवर आधारित प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी चंद्रपूर दीक्षाभूमी येथे दि. १५ व १६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच आगामी काळातील विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांचे नियोजन, कार्यकर्त्यांची भूमिका आणि संघटनात्मक समन्वय याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन सुमेध वाघमारे, BSP सेक्टर अध्यक्ष, इंदिरा नगर यांच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमास इंजि. विमित कोसे – शहर अध्यक्ष, बहुजन समाज पार्टी, चंद्रपूर; दादाजी धाकडे – शहर संघटक; अखिल निंबगडे – शहर सदस्य तथा युवा प्रचारक; किशोरजी चिकाटे – बाबूपेठ व भिवापूर झोन प्रभारी; तसेच कामडे साहेब – ज्येष्ठ कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थितांनी विविध सामाजिक व संघटनात्मक विषयांवर आपले विचार मांडले. आगामी कार्यक्रमांचे नियोजन, सामाजिक उपक्रम आणि संघटनात्मक कार्य अधिक प्रभावी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

आयोजक : सुमेध वाघमारे

BSP सेक्टर अध्यक्ष, इंदिरा नगर, चंद्रपूर.

 

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना नाव समाविष्ट करण्याची पुन्हा संधी.🔔पशुधनाला जिवंत ठेवण्यासाठी पाणी व चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा - पालकमंत्री डॉ.अशोक उईके.🔔अंतर्गत समिती' स्थापन न करणाऱ्या आस्थापनांवर 50 हजारांपर्यंत दंड.🔔जिल्ह्यात बालकामगारविरोधी धाडसत्र मोहीम राबवा.🔔दुष्काळी परिस्थितीवर एकजुटीने मात करू या! – पालकमंत्री डॉ. उईके.🔔संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच प्रभावी नियोजन करा. – जिल्हाधिकारी वसुमना पंत.🔔भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ.🔔निवृत्तीवेतनधारकांनी घरबसल्या सादर करावे डिजिटल जीवन प्रमाणपत्र.