Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या मालमत्ता कर पावतीवर (घरपावती) मालमत्तेचा पत्ता अपूर्ण किंवा चुकीचा नमूद असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेता, मनपा प्रशासनाने मालमत्ता कर पावतीवर अचूक, संपूर्ण पत्ता (पोस्टल ॲड्रेस) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अक्षांश-रेखांश (Latitude-Longitude) नमूद करण्यासाठी तातडीने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी 'जाणता राजा पक्षा'चे नितीन उदार यांनी चंद्रपूर मनपा आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
नितिन उदार यांनी पत्रात नमूद केले आहे की, मालमत्ता कर पावती ही केवळ कराची पावती नसून, सर्वसामान्य नागरिकांसाठी ती निवासी पत्त्याचा एक महत्त्वाचा शासकीय पुरावा (Address Proof) आहे.
न्यायालयीन कामकाजात आरोपीची जामीन (जमानत) घेण्यासाठी सुद्धा ही पावती अत्यंत महत्त्वाची ठरते. मात्र, चंद्रपूर महानगरपालिकेच्या बहुतांश पावत्यांवर पत्ता अपूर्ण किंवा चुकीचा नोंदवला गेला आहे.
उदाहरणार्थ, तुकुम प्रभाग क्रमांक १ मधील तुलसीनगर आणि वृंदावननगर परिसरातील मालमत्तांच्या कर पावतीवर 'दत्तनगर' असा चुकीचा पत्ता नोंदविण्यात आला आहे.
अशाच प्रकारच्या त्रुटी शहरातील इतर भागांतही असण्याची शक्यता आहे.
अपूर्ण पत्त्यामुळे नागरिकांना इतर शासकीय कागदपत्रांसाठी पत्त्याचा पुरावा म्हणून ही पावती सादर करताना अडचणी येतात.
तसेच न्यायालयीन प्रक्रियेत मालमत्तेच्या अचूक पत्त्याबाबत संभ्रम निर्माण होऊन कायदेशीर प्रक्रियेत नाहक विलंब होतो.
या सोबतच कर संकलक कर्मचाऱ्यांची अंतर्गत बदली झाल्यावर नवीन कर्मचाऱ्यांना संबंधित मालमत्तेचा प्रत्यक्ष शोध घेताना आणि कर वसुली करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
या सर्व अडचणी दुर करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने सर्व मालमत्तांची पोस्टल ॲड्रेस नुसार अचूक व संपूर्ण पत्त्यासह नोंद घेऊन ती माहिती घरपावतीवर मुद्रित करावी.
• आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मालमत्ता कर पावतीवर संबंधित मालमत्तेचे अक्षांश आणि रेखांश देखिल नमूद करण्यात यावेत.
यामुळे मालमत्तेचे अचूक भौगोलिक स्थान निश्चित होईल आणि भविष्यातील सर्व प्रशासकीय व नागरी कामे डिजिटल पद्धतीने सुलभ होतील.
महानगरपालिका प्रशासनाने हा लोकहिताचा विषय गांभीर्याने घेऊन मालमत्ता कर पावतीवर 'मालमत्ता पत्ता दुरुस्ती मोहीम' तातडीने सुरू करावी, अशी आग्रही मागणी जाणता राजा पक्षाचे नितीन उदार यांनी केली आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: