Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
चंद्रपूर, दि. 06 : मुलाचे/ मुलीचे वय 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिले मॅडेटरी बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक असते. त्यानंतर वयाची 15 वर्षे पूर्ण झाल्यावर पुन्हा बायोमेट्रिक माहिती अपडेट करावी लागते. या दोन्ही टप्प्यांवर एमबीयू वेळेत पूर्ण करणे पालकांसाठी महत्त्वाचे आहे. यामध्ये वाढत्या वयानुसार मुलांचे हातांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन आणि नवीन छायाचित्र आधारमध्ये नोंदविले जाते. एमबीयू वेळेत न केल्यास आधारशी संबंधित विविध सेवांमध्ये अडचणी निर्माण होऊन आधार कार्ड रद्द देखील केले जाऊ शकते, त्यामुळे 5 ते 17 वयोगटातील मुलांचे आधार कार्ड त्वरीत अपडेट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
लहान मुलांसाठी आधार क्रमांक अतिशय महत्वाचा असून शाळेत प्रवेश, शिष्यवृत्ती, शाळेतील नोंदणी, तसेच विविध योजनांचा लाभ घेताना आधारचा वापर होत असल्याने पालकांनी आपल्या मुलाचे आधार कार्ड काढण्याबरोबरच वेळोवेळी त्यातील माहिती अपडेट ठेवून आधारचे वेळोवेळी अद्ययावतीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचे आधार एमबीयू. मुलांच्या भविष्यातील शैक्षणिक व शासकीय कामकाजात अडथळे येऊ नयेत, यासाठी वेळीच दक्षता घेऊन एमबीयू पूर्ण करावे.
जिल्हातील एकूण प्रलंबित एमबीयूपैकी 27 हजार एमबीयू पूर्ण करण्याचे नियोजन शाळेतच विशेष शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याचा लाभ घेऊन पालकांनी आपल्या मुलांचे एमबीयू पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. तसेच यानंतरही एमबीयू प्रलंबित असल्यास जवळच्या अधिकृत आधार केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येईल.
पालकांनी आपल्या मुलाच्या आधारची सद्यस्थिती अधिकृत आधार सेवांद्वारे तपासावी. एमबीयू प्रलंबित असल्यास संबंधित आधार केंद्रावर जाऊन अपडेटची आवश्यकता आहे का, याची खात्री करता येते. आधार क्रमांकाची स्थिती तपासल्यानंतर आवश्यक असल्यास तातडीने एमबीयू पूर्ण करावे. एमबीयू वेळेत न केल्यास आधारशी संबंधित सेवांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. आधारची स्थिती आणि एमबीयूची आवश्यकता पालकांनी वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. मुलाच्या आधारचा वापर करण्यापूर्वी त्याची स्थिती सक्रिय आहे की नाही, याची खात्री करावी, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: