The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तीनही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची केली होती आमदार मुनगंटीवार यांनी आग्रही मागणी .

News Image

बल्लारपूर, जिवती, ब्रह्मपुरीच्या शेतकऱ्यांसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा पाठपुरावा फलदायी; दुष्काळी पाहणी व पंचनाम्यांचे शासनादेश.

शासन आदेशानुसार प्रत्यक्ष पाहणी, ग्राऊंड ट्रुथिंग व पंचनाम्यांच्या आधारे पुढील कार्यवाहीला होणार सुरुवात.

 

चंद्रपूर : बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी तालुक्यांतील शेतकरी व नागरिकांच्या अडचणींची संवेदनशीलतेने दखल घेत त्यांच्या हक्कासाठी शासनाच्या सर्वोच्च स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्यानंतर वगळण्यात आलेल्या बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी या तीन तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश व्हावा, यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आग्रही मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता कृषी आयुक्तालयाने दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने पीक पाहणी, ग्राऊंड ट्रुथिंग आणि पंचनामे करण्याबाबत शासन आदेश जारी केला असून, या तीनही तालुक्यांतील दुष्काळग्रस्त परिस्थितीची प्रत्यक्ष पडताळणी करून पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे.

खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाचे अनिश्चित व असमान प्रमाण, पिकांची चिंताजनक अवस्था आणि शेतकऱ्यांवर वाढत असलेला आर्थिक ताण लक्षात घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. दुष्काळाची तीव्रता केवळ कागदावरील आकडेवारीवरून नव्हे, तर शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहून निश्चित झाली पाहिजे, अशी आमदार मुनगंटीवार यांची भूमिका होती. याच भूमिकेतून आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी या तालुक्यांतील पर्जन्यमान, पिकांची सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांवर आलेले संकट याची वस्तुनिष्ठ पडताळणी करण्याची मागणी केली होती. तीनही तालुक्यांतील पात्र शेतकरी केवळ प्रशासकीय निकषांमुळे दुष्काळी मदतीपासून वंचित राहू नयेत, यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेण्यात यावा, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत प्रत्यक्ष परिस्थिती तपासण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आता कृषी आयुक्तालयाच्या आदेशान्वये पीक पाहणी, ग्राऊंड ट्रुथिंग तसेच आवश्यक पंचनामे करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. आदेशानुसार संबंधित तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता आणि पिकांची स्थिती प्रत्यक्ष तपासून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या कार्यवाहीमुळे बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी या तीनही तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनाम्यांमधून दुष्काळाची वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यानंतर त्याआधारे दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याबाबत पुढील आवश्यक कार्यवाही होणार आहे. दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांनुसार विविध सवलती व मदतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे तीनही तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी हा शासन आदेश केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून, त्यांच्या हक्काच्या मदतीकडे जाणारे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

शेतकऱ्याच्या शेतात संकट किती आहे, हे कागदावरील आकडेवारीपेक्षा त्याच्या बांधावर जाऊनच समजू शकते. त्यामुळे बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरीतील दुष्काळाची प्रत्यक्ष परिस्थिती समोर यावी आणि पात्र शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीपासून वंचित राहावे लागू नये, हीच माझी भूमिका होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत प्रत्यक्ष पाहणी व पंचनाम्यांचे निर्देश दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार, असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

शेतकरी अडचणीत असताना केवळ आश्वासन देण्यापेक्षा त्याचा प्रश्न शासनाच्या निर्णयप्रक्रियेपर्यंत नेऊन त्याला न्याय मिळवून देणे, ही आमदार मुनगंटीवार यांच्या कार्यपद्धतीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांबाबतची त्यांची संवेदनशीलता, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रशासनाकडून ठोस कार्यवाही करून घेण्याची भूमिका यामुळे बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरीतील शेतकऱ्यांच्या दुष्काळी मदतीच्या अपेक्षांना आता नवी आशा मिळाली आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तीनही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची केली होती आमदार मुनगंटीवार यांनी आग्रही मागणी .🔔सेवानिवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महाउपलब्धी’बाबत कार्यशाळा संपन्न.🔔नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी विशेष नैमित्तिक रजा.🔔राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामार्फत क्लेफ्ट लिप व पॅलेट शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबीर.🔔सेवा संकल्प अभियानांतर्गत मातोश्री वृध्दाश्रमात आरोग्य तपासणी.🔔जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक व विक्रीस बंदी.🔔5 ते 17 वयोगटातील मुलांचे आधार अपडेट करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन.🔔जांभुळघाट आश्रमशाळेचे      मुख्याध्यापक निलंबित.