The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

माधवबागतर्फे ‘Beat Diabetes – Bite By Bite’ आहार कार्यशाळेचे आयोजन.

News Image

चंद्रपूर : मधुमेह, हृदयरोग, ब्लॉकेजेस, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि थायरॉइड यांसारख्या आजारांच्या नियंत्रणासाठी योग्य आहाराला विशेष महत्त्व आहे. मात्र, आहार नियोजनाबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करून नागरिकांना योग्य आहाराचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी माधवबाग चंद्रपूरतर्फे मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी तुकूम येथील माधवबाग क्लिनिकमध्ये ‘Beat Diabetes – Bite By Bite’ या विशेष आहार मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत आहार योजना केल्याने अशक्तपणा येतो, आजारानुसार आहाराचे नियोजन करणे कठीण व वेळखाऊ असते तसेच नोकरदार आणि व्यावसायिक व्यक्तींना आहार योजना पाळणे शक्य नसते, अशा विविध गैरसमजांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्षात योग्य माहिती आणि नियोजनाच्या मदतीने आहार योजना सहजपणे पाळता येऊ शकते, हे उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.

विशेष म्हणजे, आहाराच्या मदतीने आपल्या आजारांवर नियंत्रण मिळवून औषधमुक्त झालेल्या नागरिकांनी स्वतःचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. त्यांच्या अनुभवातून योग्य आहाराचे महत्त्व आणि त्याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित झाले.

यावेळी माधवबाग चंद्रपूरच्या संचालक डॉ. प्रीती सरबेरे व डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे यांनी विविध आजारांमध्ये आहाराचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आहारतज्ज्ञ सौ. दिया केवलरामानी यांनी मधुमेहासारख्या आजारांमध्ये आरोग्यदायी, पौष्टिक आणि रुचकर आहार कसा तयार करता येतो, याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेला चंद्रपूरकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔बेपत्ता महिलेच्या ओळखीसाठी संपर्क साधा.🔔दिव्यांग व्यक्तींना स्वंयरोजगारासाठी बिज भांडवल योजना.🔔21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत पुरुष नसबंदी पंधरवडा.🔔बालमृत्यू रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात ‘सांस मोहीम’.🔔28 व 29 नोव्हेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबीर.🔔दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांमध्ये गांभिर्याने काम करा.🔔संविधानामुळेच प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार    - पालकमंत्री डॉ. अशोक उईके.🔔चंद्रपूरच्या बांधकाम कामगारांच्या किचन सेटचा प्रश्न ऐरणीवर; मंत्रालयाच्या हस्तक्षेपाची मागणी!