Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
अनुपस्थित/स्थलांतरित/मृत/दुबार प्रवर्गातील पात्र मतदारांकरीता सर्व मतदान केंद्रांवर आयोजन.
चंद्रपूर : विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-2026 अंतर्गत अनुपस्थित / स्थलांतरित / मृत / दुबार प्रवर्गातील पात्र मतदारांना, आपली नावे मतदार यादीत नोंदविण्याकरिता गणना प्रपत्र (इन्युमरेशन फॉर्म) दाखल करणे सुलभ व्हावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर शनिवार, दि. 28 आणि रविवार, दि. 29 नोव्हेंबर रोजी विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमांतर्गत गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन 18 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येत असून प्राप्त गणना प्रपत्रे 10 डिसेंबर 2026 पर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत. मतदार याद्यांचे अंतिम प्रकाशन 22 डिसेंबर 2026 रोजी करण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील संबंधित पात्र मतदारांनी 28 व 29 नोव्हेंबर रोजी आयोजित विशेष नोंदणी शिबिरांचा लाभ घेऊन आपल्या संबंधित मतदान केंद्रावर गणना प्रपत्र दाखल करावे व मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: