The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

संविधानामुळेच प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार    - पालकमंत्री डॉ. अशोक उईके.

News Image

77 वा संविधान दिन उत्साहात साजरा.

चंद्रपूर, दि. 26 : भारतरन्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानात सामाजिक न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूलभूत तत्त्वे आहेत. या संविधानामुळेच मंत्री म्हणून मी आज आपल्यासमोर उभा आहो. या देशाच्या राष्ट्रपती एक आदिवासी महिला आहे, ही सुध्दा संविधानाची ताकद आहे.  संविधानाने प्रत्येक नागरिकाला माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जीएसटी सभागृहात आयोजित 77 व्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश, अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे, प्रमुख वक्ते डॉ. टी. डी. कोसे, ॲड. जवादे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, संविधान दिन हा भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. भारतीय नागरिकांना संविधान, लोकशाही, मूलभूत हक्क आणि कर्तव्यांची जाणीव करून देणारा हा दिवस आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने संविधानाचा स्वीकार केला. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ज्ञानाचा, अभ्यासाचा आणि अनुभवाचा उपयोग करून संविधान निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

उद्देशिका ही भारतीय संविधानाचा आत्मा आहे. शासन आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीची रचना संविधानाने घालून दिली आहे. प्रत्येक नागरिकाने संविधानातील मूल्ये आत्मसात करून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी योगदान द्यावे. संविधानाची मूल्ये चिरंतन असून त्यांचे जतन आणि संवर्धन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पुढील वर्षी संविधान दिन आणखी व्यापक स्वरूपात आणि लोकसहभागातून साजरा करावा. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे कार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.

अधिकारांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव ठेवावी – आमदार किशोर जोरगेवार.

जगातील विविध राज्यव्यवस्थांमध्ये लोकशाही ही सर्वोत्तम राज्यव्यवस्था मानली जाते. भारतीय संविधान हे जगातील लिखित संविधान आहे. विविध भाषा, धर्म, संस्कृती आणि परंपरा असतानाही संविधानामुळे आपला देश एकसंघ आहे. संविधानाने नागरिकांना मूलभूत अधिकार दिले असून त्यासोबतच नागरिकांची कर्तव्येही तितकीच महत्त्वाची आहेत. प्रत्येक नागरिकाने आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवून संविधानातील मूल्यांचे पालन करावे, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह तसेच प्रमुख वक्ते डॉ. टी. डी. कोसे आणि ॲड. जवादे यांनी संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये आणि नागरिकांची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. उपेंद्र बनकर या विद्यार्थ्याने गीताच्या माध्यमातून संविधानाचा जागर केला. तत्पुर्वी उपस्थितांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी तर संचालन सचिन फुलझेले यांनी केले.

संविधान दिनानिमित्त भिवकुंड येथे स्कील लॅबचे उद्घाटन :

संविधान दिनाचे औचित्य साधून भिवकुंड येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा येथे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते स्कील लॅबचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔बेपत्ता महिलेच्या ओळखीसाठी संपर्क साधा.🔔दिव्यांग व्यक्तींना स्वंयरोजगारासाठी बिज भांडवल योजना.🔔21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत पुरुष नसबंदी पंधरवडा.🔔बालमृत्यू रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात ‘सांस मोहीम’.🔔28 व 29 नोव्हेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबीर.🔔दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांमध्ये गांभिर्याने काम करा.🔔संविधानामुळेच प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार    - पालकमंत्री डॉ. अशोक उईके.🔔चंद्रपूरच्या बांधकाम कामगारांच्या किचन सेटचा प्रश्न ऐरणीवर; मंत्रालयाच्या हस्तक्षेपाची मागणी!