Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
खाजगी आस्थापनांतील मतदारांना मतदानासाठी दोन तासांची विशेष सवलत.
चंद्रपूर, दि. 06 : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदार म्हणून नोंदणी असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजेची तरतूद आहे. खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या नोंदणीकृत मतदारांना मतदानासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने दि. 22 सप्टेंबर 2026 रोजीच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदानानंतर मंगळवार, दि. 27 ऑक्टोबर 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 23 जून 2011 रोजीच्या शासन निर्णयानुसार, पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष नैमित्तिक रजेची तरतूद करण्यात आली आहे. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल. संबंधित शासन निर्णय मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना ही विशेष नैमित्तिक रजा लागू होत नाही. त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त (सामान्य प्रशासन), नागपूर विभाग यांनी कळविले आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: