Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
ई-केवायसी, मोबाईल नोंदणी व पीपीओ क्रमांकाबाबत मार्गदर्शन.
चंद्रपूर, दि. 06 : राज्य शासनाच्या सेवानिवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ‘महाउपलब्धी’ प्रणालीचा सुलभपणे वापर करता यावा, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर यांच्या वतीने मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा कोषागार कार्यालयात आयोजित या कार्यशाळेत ‘महाउपलब्धी’ प्रणालीचा वापर, आवश्यक माहितीची नोंदणी, निवृत्तीवेतन जमा होणाऱ्या बँक खात्याचे ई-केवायसी, मोबाईल क्रमांकाची नोंदणी तसेच पीपीओ क्रमांकासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आगामी काही महिन्यांत निवृत्तीवेतनाची देयके ई-बिल प्रणालीद्वारे अदा करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने सर्व सेवानिवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी ज्या बँक खात्यात निवृत्तीवेतन जमा होते, त्या खात्याचे ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यशाळेदरम्यान उपस्थित सेवानिवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या विविध अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात आले. तसेच ‘महाउपलब्धी’ प्रणालीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया व माहिती समजावून सांगण्यात आली.
कार्यशाळेला जिल्हा कोषागार कार्यालयातील तृप्ती टेमकर, अपर कोषागार अधिकारी स्वाती कुलकर्णी, अपर कोषागार अधिकारी संजय पडीशालवार, निवृत्तीवेतनधारक संघटनेचे उपाध्यक्ष अरुण धानोरकर यांच्यासह मोठ्या संख्येने सेवानिवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक उपस्थित होते.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: