The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

जिल्ह्यातील 33 केंद्रावर धान खरेदी सुरू

News Image

चंद्रपूर, दि. 24 : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक, प्रादेशिक कार्यालय चंद्रपुर अंतर्गत शासनाच्या निर्देशनानुसार खरीप पणन हंगाम 2025-26 साठी 3 नोव्हेंबरपासून धान खरेदी सुरू झाली आहे. चिमूर, नागभीड, सिंदेवाही, वरोरा, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा व पोंभुर्णा या 8 तालुक्यातील एकूण 33 खरेदी केंद्रावर धान खरेदी करण्यात येत आहे. यात नवखळा,  मोहाडी मो., सावरगांव, चिंधीचक,  बाळापूर, कोजबी, गिरगांव, जिवनापूर, गोविंदपूर , वाढोणा, तांबेगडीमेंढा, लाढबोरी,  मुरमाडी, कळमगांव गन्ना, शिवणी, गडबोरी,  नाचनभट्टी, पेठगांव, चारगांव बु., वडधा तु. भटाळा, डोमा, खांबाडा, बोडधा,  आंबेनेरी,  अडेगाव देश, मासाळ, टेकेपार, मोटेगाव,  चंदनखेडा, पोंभुर्णा टिडीसी, करंजी, चिंचोली  या केंद्रांचा समावेश आहे. खरीप  पणन हंगाम 2025-26 मध्ये ऑनलाईन नोंदणी व धान विक्रीसाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या लगतच आ.वि.क. सह. संस्थाच्या खरेदी केंद्राशी संपर्क साधून ई-पिक पेरा केलेला सातबारा, नमूना 8 अ. आधारकार्ड ई – केवायसी केलेले बँक पासबुक,  संमतीपत्र व इतर आवश्यक दस्तावेज घेवून स्वतः हजर राहावे व ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच धान विक्री करून शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रादेशिक व्यवस्थापक म.रा. सह. आदि. विकास महामंडळ यांनी कळविले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत खजांची यांना ‘विधी भूषण पुरस्कार’, आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेऊन केले अभिनंदन.🔔पोंभुर्णा ITI मध्ये २५ हजारांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपिकाला पकडले; प्राचार्यही ACBच्या ताब्यात!🔔जिल्ह्यात 243 वनराई बंधा-यांची निर्मिती.🔔राजुरा येथील घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.🔔चंद्रपूरमध्ये गोवंश तस्करीवर पोलिसांची कारवाई; ५७ जनावरांची सुटका.🔔प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना नाव समाविष्ट करण्याची पुन्हा संधी.🔔पशुधनाला जिवंत ठेवण्यासाठी पाणी व चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा - पालकमंत्री डॉ.अशोक उईके.🔔अंतर्गत समिती' स्थापन न करणाऱ्या आस्थापनांवर 50 हजारांपर्यंत दंड.