The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

अमृतच्या वतीने 5 ते 25 नोव्हेंबर  या कालावधीत ‘अमृत दुर्गोत्सव कार्यक्रम.

News Image

चंद्रपूर, दि.29 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) च्या वतीने 5 ते 25 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ‘अमृत दुर्गोत्सव 2026’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीचा गौरवशाली इतिहास, मराठा साम्राज्याची दुर्गनिर्मिती व लष्करी स्थापत्यकला तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

‘मराठा मिलिटरी लॅन्डस्केप ऑफ इंडिया’ या नावाने मराठा लष्करी भूदृश्यांचा समावेश जुलै 2025 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे. या वारसा स्थळसमूहामध्ये महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूतील 1 अशा एकूण 12 दुर्गांचा समावेश आहे. हे दुर्ग भारताच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व स्थापत्य वारशाचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहेत. सदर उपक्रमाच्या अनुषंगाने नागरिकांना या ऐतिहासिक दुर्गांची माहिती व्हावी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची व स्वराज्याच्या इतिहासाची ओळख नव्या पिढीला व्हावी, तसेच ऐतिहासिक वारशाच्या जतन व संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने छायाचित्रांसह माहितीपत्रक

तयार करण्यात आले आहे.

कोण सहभागी होऊ शकते : जगातील कोणतीही व्यक्ती, कुटुंब, गृहसंकुल, संस्था, गट, शाळा किंवा महाविद्यालय.

12 दुर्गांची यादी पुढीलप्रमाणे आहे :

 1. रायगड किल्ला, 2. राजगड किल्ला,

3. शिवनेरी किल्ला, 4. प्रतापगड किल्ला,

5. पन्हाळा किल्ला, 6. विजयदुर्ग किल्ला,

7. लोहगड किल्ला, 8. साल्हेर किल्ला,

9. सिंधुदुर्ग किल्ला, 10. सुवर्णदुर्ग किल्ला,

11. खांदेरी किल्ला, 12. जिंजी किल्ला (तमिळनाडू)

अधिक माहितीकरीता :

Website – amrutdurgotsav.com,

संपर्क क्रमांक : अमृत चंद्रपूर जिल्हा कार्यालय : 9112228774,

आदित्यसिंह सेंगर  9607443742,

 सतीश नारायणदास : 9890746453

यावर संपर्क करावा, असे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔जिल्ह्यातील 2 लक्ष 44 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता.🔔अमृतच्या वतीने 5 ते 25 नोव्हेंबर  या कालावधीत ‘अमृत दुर्गोत्सव कार्यक्रम.🔔दैनंदिन साफसफाई करीता निविदा आमंत्रित.🔔जिल्हा परिषद अंतर्गत 18 नोव्हेंबर रोजी पेंशन अदालत.🔔चंद्रपुर शहर महानगरपालिकेने मालमत्ता कर पावतीवर  अचूक पत्त्यासह 'अक्षांश-रेखांश' नमूद करण्यासाठी विशेष मोहीम  राबवावी: नितीन उदार🔔बंधाऱ्याचे बिल मंजूर करण्यासाठी ₹४० हजारांची लाच स्वीकारताना कोरपण्यातील कृषी सहाय्यक ACB च्या जाळ्यात.🔔पोलीस स्टेशन राजुरा येथील दरोड्याच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला फरार आरोपीस अन्य चोरीच्या गुन्ह्यातही मुद्देमालासह पकडून आरोपी विरुध्द स्थागुशा चंद्रपूर कडून कारवाई.🔔निवडणूक संपताच आमदार किशोर जोरगेवार कामाला, नजूल धारकांच्या पट्टे वाटपासाठी महसूल मंत्री यांच्याकडे पाठपुरावा.