The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित.

News Image

चंद्रपूर,दि.23 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. ज्या मुलांनी (वय 5 वर्षांपेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या), शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली आहे, त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 करीता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत.

सदरचे अर्ज http://awards.gov.in

या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.

ज्या मुलांचे वय 5 पेक्षा अधिक व 31 जुलै, 2026 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली आहे, त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्यावतीने राज्य सरकार, केंद्रशासिन प्रदेश, जिल्हाधिकारी / जिल्हा दंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख 1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेली असून सदर संकेतस्थळावर पात्र उमेदवारांनी जावून अर्ज करावे.

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, चंद्रपूर कार्यालयाशी संपर्क साधावा.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔बल्लारपुरात काँग्रेस विजयाचा निर्धार; अभिजित वंजारी यांनी भरला पदाधिकाऱ्यांत जोश.🔔बल्लारपूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी.🔔‘सेवा संकल्प’ अंतर्गत सीईओ यांच्या विविध गावांना भेटी.🔔15 ऑक्टोबरला जागतिक हात धुवा दिन.🔔चिमूर येथे राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमाचा थाटात समारोप.🔔महसूल लोक अदालतीत  16 प्रकरणे निकाली.🔔दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा संकल्प.🔔ज्ञानासाठी गुंतवणूक हाच आपला विकासमंत्र : ॲड. अभिजित वंजारी.