The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

मुख्यमंत्री करणार माता महाकालींच्या आशीर्वादाने चंद्रपूर महानगरपालिका प्रचाराचा शुभारंभ

News Image

आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेत दिले निमंत्रण आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात आराध्य दैवत श्री माता महाकाली यांच्या पावन दर्शन व आशीर्वादाने व्हावी, अशी आग्रहपूर्ण विनंती आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना केली आहे. आज मुंबई येथील वर्षा बंगल्यावर झालेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी सदर विनंती केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरला येण्यास मान्यता दिल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले आहे. चंद्रपूर ही माता महाकालींच्या कृपेने नटलेली भूमी असून, येथील जनतेची श्रद्धा आणि विकासाचा संकल्प यांची सांगड घालत प्रचाराचा प्रारंभ देवीच्या आशीर्वादाने व्हावा, अशी भूमिका आमदार किशोर जोरगेवार यांनी मांडली. महानगरपालिका निवडणूक ही केवळ राजकीय प्रक्रिया नसून शहराच्या भावी विकासाची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे या प्रक्रियेची सुरुवात आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेने व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या या आग्रहपूर्ण विनंतीला मान्यता देत सकारात्मक प्रतिसाद दिला. माता महाकालींच्या आशीर्वादाने चंद्रपूरच्या विकासयात्रेला अधिक बळ मिळेल, तसेच शहरातील पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, स्वच्छता, आरोग्य आणि नागरी सुविधांना गती मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. लवकरच मुख्यमंत्री यांच्या चंद्रपूर आगमनाची तारीख निश्चित होणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔बल्लारपुरात काँग्रेस विजयाचा निर्धार; अभिजित वंजारी यांनी भरला पदाधिकाऱ्यांत जोश.🔔बल्लारपूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी.🔔‘सेवा संकल्प’ अंतर्गत सीईओ यांच्या विविध गावांना भेटी.🔔15 ऑक्टोबरला जागतिक हात धुवा दिन.🔔चिमूर येथे राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमाचा थाटात समारोप.🔔महसूल लोक अदालतीत  16 प्रकरणे निकाली.🔔दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा संकल्प.🔔ज्ञानासाठी गुंतवणूक हाच आपला विकासमंत्र : ॲड. अभिजित वंजारी.