The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

पोलीस भरती प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या सेन्सरची तपासणी करा.

News Image
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूरचे पोलिस अधीक्षकांना सूचना.
तांत्रिक बिघाडाचा फटका सक्षम उमेदवारांना; आ. मुनगंटीवार यांनी वेधले लक्ष.
प्रारंभबिंदूवरही सेन्सर बसवून अचूक मोजमाप सुनिश्चित करण्याची आ.मुनगंटीवार यांची मागणी.
आ.मुनगंटीवार यांचे उमेदवारांनी मानले आभार.
  चंद्रपूर - राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत १०० मीटर धावण्याच्या परीक्षेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या सेन्सरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याच्या तक्रारींची लगेच दाखल घेत पोलिस अधीक्षक यांना पत्र लिहून लक्ष वेधले. या धावण्याच्या परीक्षेत वापरलेल्या सेन्सरमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने अनेक सक्षम व सुदृढ उमेदवारांना १५ पैकी केवळ ४, ६ किंवा ८ असे अत्यल्प गुण मिळत असल्याचे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी निदर्शनास आणून दिले. पोलिस अधीक्षकांनी याची तात्काळ तपासणी करावी अशा सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. याशिवाय धावण्याच्या प्रारंभबिंदूवर सेन्सर बसविण्यात आलेला नसल्याचीही माहिती उमेदवारांकडून मिळत आहे. त्यामुळे वेळ मोजण्यात अचूक मोजमाप होत नसून उमेदवारांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण तयार झाले आहे. इतर जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीदरम्यान उमेदवारांना १५ पैकी १३ ते १५ गुण मिळत असल्याचे दिसून येत असताना, चंद्रपूरमध्ये तुलनेने अत्यल्प गुण मिळत असल्याने स्थानिक उमेदवारांमध्ये असंतोष वाढत असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर सदर प्रकरणाची तातडीने निष्पक्ष तपासणी करून धावण्याच्या परीक्षेत वापरला जाणारा सेन्सर तपासावा, आवश्यक असल्यास बदलावा, तसेच प्रारंभबिंदूवरही सेन्सर बसवून धावण्याचे अचूक मोजमाप सुनिश्चित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित हा अत्यंत संवेदनशील विषय असून कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, असेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रामध्ये अधोरेखित केले आहे. उमेदवारांनी मानले आभार आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार त्यांचे स्वीय सहाय्यक सतीश जोशी, लक्ष्मण शेंडे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर केले. यावेळी उमेदवारांच्या शिष्टमंडळासोबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दूरध्वनीवर संवाद साधत कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिले. पोलिस अधीक्षक मूमक्का सुदर्शन हे नागभीड दौऱ्यावर असल्याने एसडीपीओ चौगुले यांनी निवेदन स्वीकारले. तसेच पोलिस अधीक्षकांनीही उमेदवारांच्या प्रतिनिधींशी दूरध्वनीवर चर्चा करून पूर्ण खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी उमेदवारांनी हे प्रकरण गांभीर्याने लक्षात घेतल्याबद्दल आ. मुनगंटीवार यांचे आभार मानले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.