The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

अपयशातही यशाचा संकल्प करण्याची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये तयार करा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे शिक्षक-प्रशिक्षकांना आवाहन

News Image

उथळपेठ येथे बीट स्तरीय बाल क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन

   चंद्रपूर - क्रीडा स्पर्धा म्हटल्यावर एकाचा विजय होणार तर दुसऱ्याचा पराभव होणार. पण अपयश आल्यानंतर दुसऱ्याच्या यशामध्ये आनंद शोधता आला पाहिजे. अपयशातच यशाचा संकल्प मनात करण्याची आणि उद्याचा दिवस माझा असेल असा निर्धार करण्याची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये तयार करण्याची जबाबदारी शिक्षक-प्रशिक्षकांनी पार पाडावी, यातूनच विद्यार्थी घडत असतो, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज, मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी उथळपेठ येथे केले.

 उथळपेठ येथे बीट स्तरीय बाल क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उथळपेठ ग्रामपंचायतचे सरपंच पलिंद्र सातपुते, मुल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर शिंदे, गटशिक्षणाधिकारी जयश्री गुज्जनवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरधर चिचघरे, उपाध्यक्ष गणेश चिचघरे, उपसरपंच भारती पिंपळे, ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षी बुरांडे, अर्चना चिचघरे, श्रीकांत बुरांडे, सुरेंद्र चिचघरे, वर्षा वाढई, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गोपाल चिचघरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य शितल बुरांडे, ज्योत्स्ना वाडगुरे, निलेश बुरांडे, प्रवीण सातपुते, अल्का शेडमाके, रोशन चिचघरे, पोलीस पाटील भाग्यश्री चिचघरे, उथळपेठ ग्रामपंचायत सचिव साईनाथ कंबलवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 तीन दिवसीय या स्पर्धेमध्ये चिचाळा बीटातील २१ शाळांमधील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल आमदार श्री. मुनगंटीवार यांनी कौतुक केले. विशेष म्हणजे आ. मुनगंटीवार यांनी स्पर्धेसाठी विशेष बक्षीस जाहीर केली.

 आ. मुनगंटीवार म्हणाले, ‘राज्यात उथळपेठ गावाने १०० टक्के सोलार ग्राम म्हणून निर्माण केलेली ओळख कौतुकास्पद आहे. सुसज्ज ग्रामपंचायत इमारत आणि गावातील भौतिक सुविधा तसेच सीसीटीव्ही कॅमेरा व्यवस्था यांसाठी उथळपेठला आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त झाले. माझ्या बल्लारपूर मतदारसंघातील गाव असल्याचा मनापासून अभिमान आहे. हे सर्व गावकऱ्यांच्या एकजुटीचे जिवंत उदाहरण आहे. आता उथळपेठ या ऊर्जाग्राममधून ज्ञानाची ऊर्जा आणि प्रेमाची उब घेऊन उथळपेठ येथील विद्यार्थी मोठी स्वप्ने पाहत आहे. आपल्या क्रीडा कौशल्यातून उथळपेठ गावाचा व बल्लारपूर मतदारसंघाचा मान वाढविण्यात निश्चित यशस्वी होईल असा विश्वास आहे.’

 पहिल्यांदा गावे छोटी होती, पण माणसाचे मन मोठे होते. आता गावे मोठी झाली, पण माणसांची मने छोटी झाली. पण उथळपेठ गाव त्याला अपवाद आहे. हे गाव तर मोठे होतच आहे, शिवाय येथील मनही मोठे आहे, असेही ते म्हणाले.  

 विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मी स्वतः नगरपरिषद व जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतले आहे. आपण कुठे शिकलो यापेक्षा, किती एकाग्रतेने आणि मनापासून शिकतो हे अधिक महत्त्वाचे आहे. लहानपणापासून आपण एकलव्याची कथा ऐकतो जे अर्जुनाला जमले नाही, ते एकलव्याने साध्य केले. मग जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना का जमू नये? योग्य मार्गदर्शन, मेहनत आणि आत्मविश्वास असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातून यश नक्कीच घडू शकते, असे त्यांनी नमूद केले. यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी लहान शालेय विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी आर्थिक मदत दिली.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.