The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

पदयात्रा आणि कॉर्नर सभेतून आमदार किशोर जोरगेवार प्रचाराच्या मैदानात

News Image

चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस अधिकच वेग घेत असून, या प्रचारात भारतीय जनता पार्टीने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार हे प्रत्यक्ष मैदानात उतरले असून, पदयात्रा आणि कॉर्नर सभांच्या माध्यमातून त्यांनी प्रचाराला नवी धार दिली आहे.

 आज आमदार किशोर जोरगेवार यांनी बंगाली कॅम्प प्रभागात पदयात्रा काढून महायुतीच्या उमेदवारांसाठी नागरिकांकडे थेट मतदानाचे आवाहन केले. या पदयात्रेदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, घरपट्टे, आरोग्य सुविधा यासह विविध स्थानिक प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली.

 या पदयात्रेत जयश्री जुमडे, आकाश मस्के, सारिका संदुरकर, रॉबीन बिश्वास यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. संध्याकाळी सुरू झालेली ही पदयात्रा श्याम नगर, फुकट नगर, रमाबाई नगर मार्गे शास्त्रीकार ले-आउट होत अखेर बंगाली कॅम्प परिसरात पोहोचली.

 पदयात्रेदरम्यान विविध ठिकाणी छोट्या कॉर्नर सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभांमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विकासात्मक योजनांची माहिती देत, त्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मिळालेला पाठिंबा पाहता प्रचाराला निश्चितच बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले. महायुतीच्या माध्यमातून चंद्रपूर शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.