The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

सेवा, संवेदना आणि समर्पणाचा दीप विसावला - आ. किशोर जोरगेवार

News Image

चंद्रपूरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ, संवेदनशील समाजसेवक व पर्यावरणप्रेमी डॉ. गोपाल मुंधडा यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हळहळला आहे. वैद्यकीय सेवेला सामाजिक बांधिलकीची जोड देत त्यांनी आयुष्यभर निःस्वार्थ भावनेने जनसेवा केली. डॉ. मुंधडा हे केवळ नामवंत बालरोगतज्ज्ञ नव्हते, तर दुर्गम व आदिवासी भागातील गोरगरीब जनतेसाठी आधारवड होते. मोफत वैद्यकीय शिबिरे, बालकांचे आरोग्य, महिलांचे आरोग्य, रक्तदान, नेत्रतपासणी अशा विविध उपक्रमांतून त्यांनी हजारो गरजूंना नवजीवन दिले. ४० वर्षा पासून माझे त्यांच्याशी कौटुंबिक संबध होते. अनेकदा माझी त्यांच्याशी भेट होत असे. त्या प्रत्येक भेटीत ते विविध विषयांवर अत्यंत आपुलकीने व दिलखुलास चर्चा करायचे. त्यांच्या बोलण्यातून केवळ ज्ञान नव्हे, तर समाजाबद्दलची खोल संवेदना आणि सामाजिक भान प्रकर्षाने जाणवत असे. गरिबांचे दुःख, बालकांचे आरोग्य, पर्यावरणाची काळजी याबाबत त्यांची तळमळ प्रत्येक संवादात स्पष्ट दिसायची. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य, समाजासाठी झटणारा, माणुसकी जपणारा सजग विचारवंत आज आपल्यातून हरपला आहे, ही जाणीव मनाला वेदना देणारी आहे. त्यांच्या जाण्याने सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. समाजासाठी जगणारा एक दीपस्तंभ आपण गमावला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना व आप्तेष्टांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔बल्लारपुरात काँग्रेस विजयाचा निर्धार; अभिजित वंजारी यांनी भरला पदाधिकाऱ्यांत जोश.🔔बल्लारपूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी.🔔‘सेवा संकल्प’ अंतर्गत सीईओ यांच्या विविध गावांना भेटी.🔔15 ऑक्टोबरला जागतिक हात धुवा दिन.🔔चिमूर येथे राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमाचा थाटात समारोप.🔔महसूल लोक अदालतीत  16 प्रकरणे निकाली.🔔दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा संकल्प.🔔ज्ञानासाठी गुंतवणूक हाच आपला विकासमंत्र : ॲड. अभिजित वंजारी.