The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ‘एआय डिस्ट्रिक्ट हब’ स्थापन करणार!

News Image

गडचिरोतील सभेत काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांची घोषणा.

 

गडचिरोली, दि. १३ : गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि दुर्गम जिल्ह्यातील पदवीधर युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोलीसह पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ‘एआय डिस्ट्रिक्ट हब’ची स्थापना करण्यावर आपण भर देणार आहोत, असे प्रतिपादन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी केले.

 

पदवीधरांच्या कौशल्यविकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांना रोजगारक्षम बनविणे, हेसुद्धा आपले मिशन असल्याचे त्यांनी गडचिरोली येथे आयोजित आढावा बैठकीत सांगितले.

 

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट), विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ (विमाशि) तसेच विविध शिक्षक व कर्मचारी संघटना, महाविकास आघाडीच्या वतीने अभिजित वंजारी निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली येथे आयोजित सभेत संघटनात्मक तयारी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि आगामी प्रचाराचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

पदवीधरांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने डॉ. श्रीकांत जिचकार पदवीधर भवन उभारण्याचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. पदवीधरांना मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांची तयारी, विविध उपक्रम आणि संघटनात्मक संवादासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या दृष्टीने पदवीधर भवनाची संकल्पना उपयुक्त ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्यविकास आणि आवश्यक शैक्षणिक सुविधांच्या माध्यमातून पदवीधरांना प्रगतीच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यावर वंजारी यांनी भर दिला.

 

या सभेला नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव दुष्यंत किरसान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष अतुल पवार, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाश इतकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय ठाकरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते प्रभाकर कोशिम, प्राचार्य समशेर खान पठाण आणि प्राचार्य मनोहर पाटील पोरेडी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

बैठकीत पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी संपर्कयंत्रणा उभारणे, शिक्षक व कर्मचारी संघटनांशी समन्वय वाढविणे आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकजुटीने निवडणुकीच्या कामाला लागणे, यावर भर देण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधरांच्या अपेक्षा आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन निवडणूक प्रचाराची दिशा ठरविण्याबाबतही चर्चा झाली.

 

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔चंद्रपुरात महायुतीचे पदवीधर मतदार संमेलन; पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांची उपस्थिती, उमेदवार सुधाकर कोहळे यांना समर्थनाचे आवाहन.🔔आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ५१ फूट उंच ध्वजाच्या ध्वजारोहनाने महाकाली महोत्सवाचा शुभारंभ, मातेच्या चांदीच्या मूर्तीची निघाली पालखी .🔔पदवीधरांच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध : ॲड. अभिजित वंजारी.🔔पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ‘एआय डिस्ट्रिक्ट हब’ स्थापन करणार!🔔चंद्रपूर जिल्ह्यातील 3410 शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची तिसरी यादी प्राप्त.🔔मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या पाच फरार आरोपींचा शोध सुरू.🔔धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल.🔔राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या नोंदीचा हिशोब उपलब्ध.