The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल.

News Image

जिल्हा पोलिस अधिक्षकांनी निर्गमित केले आदेश.

चंद्रपूर, दि. 13 : शहरातील दीक्षाभूमी येथे 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी धम्मचक अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून सदर सोहळ्याकरीता जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. या दरम्यान वाहतुक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, म्हणून दीक्षाभूमी मैदानकडे जाणाऱ्या रहदारीच्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळ शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपानी यांनी निर्गमित केले आहे.

सदर आदेशानुसार 15 ऑक्टोबरच्या सकाळी 8 वाजतापासून 17 ऑक्टोच्या सकाळी 8 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहे.

दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या बौध्द बांधवाची गर्दी पाहता पाण्याची टाकी चौक- जुना वरोरा नाका ते कलेक्टर बंगला रोड, हुतात्मा स्मारक जवळील रोड तसेच वरोरा नाका चौक- मित्रनगर चौक ते सिंधी पंचायत भवन व मित्रनगर चौक ते जिल्हा स्टेडीयमपर्यंत या सर्व परीसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहील. तसेच सदरचा सर्व परीसर ‘नो पार्किंग व नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे निर्देशित काळात सदर परिसरात कोणतेही वाहने, हॉकर्स लावण्यात येऊ नये.

अवजड वाहनाकरीता पर्यायी रहदारीचा मार्ग :1) सदर अधिसुचनेच्या कालावधी दरम्यान गरजेनुसार नागपूरकडून चंद्रपुरकडे येणारी सर्व प्रकारची जड वाहने, ही हॉटेल कुंदन प्लाझा येथुन सीटीपीएस मार्गे नेहरू नगर वरून मुल रोडला जातील. 2) मुलकडून नागपुरकडे जाणारी जड वाहने ही बंगाली कॅम्प- सावरकर चौक- वरोरा नाका उड्डाणपुल  मार्गाने जातील किंवा नेहरू नगर वरून सीटीपीएस मार्गे नागपुरकडे जातील. तसेच गरजेनुसार एम.ई.एल. नाका - सावरकर चौक- वरोरा नाका उडाणपुल येथे सदर वाहने थांबवण्यात येतील. 3) बल्लारशाकडून नागपूरकडे जाणारी जड वाहने बंगाली कॅम्प- नेहरू नगर वरून सीटीपीएस मार्गे नागपुरकडे जातील किंवा पलीकडे बंगाली कॅम्प डि.आर.सी. बंकर, बायपास रोड येथे दीक्षाभूमी मार्गावरील अनुयायांची गर्दी पाहुन थांबवण्यात येईल.

शहरातील दुचाकी व चारचाकी (हलकी) वाहनाकरीता रहदारी व्यवस्था : जुना वरोरा नाका चौक ते आंबेडकर महाविद्यालय-मित्र नगर चौक- टि.वी. हॉस्पीटल पर्यंतचा मार्ग सर्व प्रकारचे वाहनाकरिता (सायकल सहीत) बंद करण्यात येत आहे. पाण्याची टाकी- विश्रामगृह- जुना वरोरा नाका हा मार्ग सर्व प्रकारचे वाहनाकरिता (सायकल सहीत) दोन्ही बाजूने बंद करण्यात येत आहे. करिता नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने (जड वाहने वगळून) वरोरा नाका- उड्डान पुल- सिध्दार्थ हॉटेल- बस स्टँड- प्रियदर्शनी चौक मार्गे शहराकडे जातील.

रामनगर, मित्र नगर, आकाशवाणी, स्नेहनगर, वडगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याची टाकी -दवा बाजार-संत केवलराम चौक- दाताळा रोड मार्गे पर्यायी रस्त्याने आपली वाहने (जड वाहने वगळून) घेऊन जातील. त्याचप्रमाणे जटपुरा गेटकडून रामनगर मार्गे जुना वरोरा नाकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी आपली वाहने पाण्याची टाकी- प्रियदर्शनी चौक- बस स्टँड- सिध्दार्थ हॉटेल -उडान पुल मार्गे नागपूरकडे जातील. दीक्षाभूमी ते संत केवलराम चौक या दरम्यान राहणा-या रहिवाशांनी आपली वाहने रस्त्याच्या बाजुला उभी न करता घोषित करण्यात आलेल्या पार्किंगमध्ये ठेवावीत.

आय.टी.आय. कॉलेज ते जिल्हा स्टेडीयम र्यंत तसेच वरोरा नाका दर्ग्याच्या उजव्या बाजूने जाणारा रस्ता-पूट्टेवार हॉस्पीटल- बुकावार हॉस्पीटल- वरोरा नाका ते पिंक प्लॅनेट पर्यंत नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन म्हणुन घोषित करण्यात येत आहे.

दीक्षाभूमी सोहळयास येणाऱ्या नागरिकांकरिता वाहन पार्कीग स्थळ : 1) नागपूर रोडने दीक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनाकरीता शकुंतला लॉन, जनता कॉलेज समोरील पटांगण (ईदगाह मैदान) 2) शहरातून दीक्षाभूमी कडे येणारे वाहनाकरीता सेंट मायकल स्कूल मैदान, सिंधी पंचायत भवन जवळील मैदान 3) वडगांव, आकाशवाणी व लगतच्या परिसरातून दीक्षाभूमीकडे येणारी वाहनाकरीता लोकमान्य टिळक हायस्कुल (जिल्हा स्टेडीयम जवळ) 4) मुल रोड, बंगाली कॅम्प, तुकुम या परिसरातून येणाऱ्या अनुयायांनी आपली वाहने कृषी भवन जवळील ट्रॅव्हल्स स्टँड या ठिकाणी (मोटार सायकल) पार्क करावी व चारचाकी वाहने वरील दिलेल्या इतर पार्किंग स्थळी पार्क करावी.

सदर अधिसूचना 15 ऑक्टो सकाळी 8 वा. पासून 17 ऑक्टो सकाळी 8 वाजेपर्यंत अंमलात राहील. तसेच सदर अधिसूचनेच्या अमंलबजावणीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल. तरी धम्मचक अनुप्रवर्तन दिन सोहळयामध्ये सहभागी सर्व बौध्द बांधव/अनुयायी व जनतेने वरील वाहतूक व्यवस्थेचा वापर करून घोषित पार्कींग व्यवस्थेमध्येच आपली वाहने ठेवावी तसेच शांतता व सुव्यवस्था आबाधित राखण्यास पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ५१ फूट उंच ध्वजाच्या ध्वजारोहनाने महाकाली महोत्सवाचा शुभारंभ, मातेच्या चांदीच्या मूर्तीची निघाली पालखी .🔔पदवीधरांच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध : ॲड. अभिजित वंजारी.🔔पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ‘एआय डिस्ट्रिक्ट हब’ स्थापन करणार!🔔चंद्रपूर जिल्ह्यातील 3410 शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची तिसरी यादी प्राप्त.🔔मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या पाच फरार आरोपींचा शोध सुरू.🔔धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल.🔔राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या नोंदीचा हिशोब उपलब्ध.🔔पदवीधरांच्या हक्कांसाठी ‘मिशन जॉब्स’ आणि ‘मिशन एक्झाम’चा संकल्प.