The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

‘भूमिपुत्रांचा एल्गार’ नाटिकेतून आदिवासी क्रांतिकारकांच्या शौर्यगाथेला उजाळा.

News Image

सेवा संकल्प अभियानांतर्गत आश्रमशाळांमध्ये नाटिकेचे सादरीकरण.

चंद्रपूर, दि. 12 : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिकारकांनी दिलेले अमूल्य योगदान, त्यांचा संघर्ष, शौर्य आणि बलिदानाची प्रेरणादायी गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या वतीने ‘भूमिपुत्रांचा एल्गार’ या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. सेवा संकल्प अभियानांतर्गत चंद्रपूर प्रकल्पातील तीन शासकीय आश्रमशाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.

आदिवासी समाजाला गौरवशाली इतिहास आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी अन्याय व अत्याचाराविरुद्ध संघर्ष करीत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. मात्र, त्यांच्या शौर्यगाथा आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. याच उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या संकल्पनेतून केंद्रवर्ती योजनेअंतर्गत ‘भूमिपुत्रांचा एल्गार’ या नाटिकेच्या सादरीकरणाचा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत शासकीय आश्रमशाळा जिवती, शासकीय आश्रमशाळा देवाडा आणि शासकीय आश्रमशाळा बोर्डा येथे नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांसह परिसरातील आदिवासी बांधवांनाही क्रांतिकारकांच्या शौर्यगाथेची ओळख व्हावी, या दृष्टीने नाटिकेचे आयोजन करण्यात आले. या आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करीत प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे आभार मानले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या नोंदीचा हिशोब उपलब्ध.🔔पदवीधरांच्या हक्कांसाठी ‘मिशन जॉब्स’ आणि ‘मिशन एक्झाम’चा संकल्प.🔔‘भूमिपुत्रांचा एल्गार’ नाटिकेतून आदिवासी क्रांतिकारकांच्या शौर्यगाथेला उजाळा.🔔दुर्गम व आदिवासी बहुल क्षेत्रात विधीसेवा प्राधिकरणतर्फे विशेष शिबीर.🔔मुख्यमंत्री पशुधन योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू नाही; शेतकरी व बेरोजगारांचे लक्ष!🔔मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान.🔔दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज.🔔अनधिकृत पाणी उपशाविरोधात होणार कठोर कारवाई.