The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या नोंदीचा हिशोब उपलब्ध.

News Image

पुनरीक्षण प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार असल्याचे राजुरा मतदार नोंदणी अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण.

चंद्रपूर, दि. 12 : राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी आणि विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पारदर्शक व नियमानुसार राबविण्यात येत आहे.

ईएफ फॉर्म प्राप्त न झालेल्या मतदारांची स्वतंत्र पडताळणी करून त्यांचे वर्गवारीनिहाय अभिलेख तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे 14 हजार 694 मतदारांचा हिशोब लागत नसल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचे मतदार नोंदणी अधिकारी तथा राजुराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांनी स्पष्ट केले आहे.

राजुरा विधानसभा मतदारसंघात 18 जून 2026 रोजी उपलब्ध नोंदीनुसार एकूण 3 लाख 10 हजार 584 मतदार होते. या सर्व मतदारांसाठी ईएफ (Enumeration Form) फॉर्म छापून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) वितरित करण्यात आले. त्यापैकी 2 लाख 72 हजार 846 मतदारांचे भरलेले व स्वाक्षरी केलेले फॉर्म प्राप्त झाले असून, त्यांचे डिजिटायझेशन पूर्ण करण्यात आले आहे. ईएफ फॉर्म प्राप्त न झालेल्या मतदारांची संबंधित बीएलओ यांच्यामार्फत स्वतंत्र पडताळणी करण्यात आली.

उपलब्ध वर्गवारीनुसार एकूण 37 हजार 738 मतदारांपैकी 20 हजार 666 मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित, 9129 मृत मतदार, 3352 मतदार पत्त्यावर न आढळलेले किंवा अनुपस्थित, 3817 मतदारांची अन्यत्र आधीच नोंदणी झालेली तर 774 मतदार इतर कारणांमुळे संबंधित वर्गवारीत समाविष्ट आहेत.

या प्रकारे मतदारांच्या नोंदींचे वर्गीकरण करून त्याबाबतची माहिती संकलित करण्यात आली आहे. मतदारांच्या नोंदींबाबत प्रशासनाकडे आवश्यक अभिलेख उपलब्ध असून, मतदार यादी पुनरीक्षणाची कार्यवाही निर्धारित प्रक्रियेनुसार सुरू आहे.

बनावट नोंदणीच्या संशयास्पद अर्जांवर कारवाई : राजुरा विधानसभा मतदारसंघात ईआरओ नेट (ERO NET) ऑनलाइन प्रणालीद्वारे बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणीचे 7 हजार 465 संशयास्पद अर्ज सादर करण्यात आले होते. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत या अर्जांची चौकशी करण्यात आली. अर्जदार दिलेल्या पत्त्यावर आढळून न येणे, अर्जदाराचे अस्तित्व आढळून न येणे, छायाचित्रे व आवश्यक पुरावे उपलब्ध नसणे आदी कारणांमुळे 6 हजार 853 संशयास्पद अर्ज नियमानुसार नामंजूर करण्यात आले.

या प्रकरणात तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांच्या तक्रारीवरून 19 ऑक्टोबर 2024 रोजी राजुरा पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक 0629 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

राजकीय पक्षांना वेळोवेळी माहिती उपलब्ध : विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेबाबत नोंदणीकृत राजकीय पक्षांना वेळोवेळी माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी 11 मे, 6 जुलै, 11 जुलै, 29 जुलै, 10 ऑगस्ट, 13 ऑगस्ट आणि 21 सप्टेंबर 2026 रोजी उपविभागीय कार्यालयात बैठका आयोजित करण्यात आल्या. या बैठकांमध्ये मतदार पडताळणी, ईएफ फॉर्मचे संकलन आणि पुनरीक्षण प्रक्रियेची माहिती देण्यात आली. तसेच ईएफ फॉर्म प्राप्त न झालेल्या 37 हजार 738 मतदारांची यादी नोंदणीकृत राजकीय पक्षांना पेनड्राइव्हद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत 2 लाख 72 हजार 846 मतदारांचा समावेश आहे. ही यादी संबंधित मतदान केंद्रे, तहसील कार्यालये, पंचायत समिती कार्यालये आणि नगर परिषद कार्यालयांमध्ये नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली.

प्रारूप मतदार यादीच्या पडताळणीदरम्यान लॉजिकल डिस्क्रिपन्सी (Logical Discrepancy) आणि नो मॅपिंग (No Mapping) या प्रकारांतील एकूण 9009 नोंदींची पडताळणी आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. या नोंदींच्या सुनावणीसाठी 25 सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित चारही तालुक्यांमध्ये सुनावणी व पडताळणीची कार्यवाही सुरू असून, अंदाजे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. मतदारांकडून प्राप्त आवश्यक कागदपत्रे बीएलओ ॲपवर अपलोड करण्यात येत आहेत.

16 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी : मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेतील उर्वरित कामकाज विहित कालमर्यादेत पूर्ण करून 16 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे.

राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारांची पडताळणी, ईएफ फॉर्मचे डिजिटायझेशन, संशयास्पद अर्जांवरील कारवाई आणि विसंगत नोंदींच्या सुनावणीची कार्यवाही नियमानुसार सुरू आहे.

मतदारांच्या नोंदींची वर्गवारीनिहाय माहिती उपलब्ध असून, 14 हजार 694 मतदारांचा हिशोब लागत नसल्याच्या वृत्तात तथ्य नाही, असा खुलासा मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, राजुरा यांनी केला आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या नोंदीचा हिशोब उपलब्ध.🔔पदवीधरांच्या हक्कांसाठी ‘मिशन जॉब्स’ आणि ‘मिशन एक्झाम’चा संकल्प.🔔‘भूमिपुत्रांचा एल्गार’ नाटिकेतून आदिवासी क्रांतिकारकांच्या शौर्यगाथेला उजाळा.🔔दुर्गम व आदिवासी बहुल क्षेत्रात विधीसेवा प्राधिकरणतर्फे विशेष शिबीर.🔔मुख्यमंत्री पशुधन योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू नाही; शेतकरी व बेरोजगारांचे लक्ष!🔔मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान.🔔दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज.🔔अनधिकृत पाणी उपशाविरोधात होणार कठोर कारवाई.