The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

अरुण लाखानी यांची विधान परिषदेवर होणार बिनविरोध निवड; आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून अभिनंदन.

News Image

चंद्रपूर : इतर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण लाखानी यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी अरुण लाखानी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अरुण लाखानी यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शैलेश अग्रवाल आणि सुधीरचंद्र कोठारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने अरुण लाखानी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या निवडीमुळे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विविध स्तरातून लाखानी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दीर्घकाळ काम करताना त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच विकासाभिमुख राजकारणासाठी केलेले योगदान लक्षात घेता त्यांची विधान परिषदेसाठी झालेली निवड ही पक्षाच्या विश्वासाची पावती असल्याचे मानले जात आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या अभिनंदन संदेशात म्हटले आहे की, “अरुण लाखानी यांची विधान परिषदेवर होणार असलेली बिनविरोध निवड ही भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक ताकदीची आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमांची पावती आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या विकासासाठी निश्चितच होईल. विधान परिषदेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील, असा मला विश्वास आहे.” यावेळी आमदार जोरगेवार यांनी अरुण लाखानी यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या माध्यमातून या तीनही जिल्ह्यांच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी अरुण लाखानी यांचे अभिनंदन करून आनंदोत्सव साजरा केला.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.