The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

भारतीय जनता पक्ष राष्ट्रसेवा, जनसेवा आणि विकास यांना सर्वोच्च प्राधान्य देणारा विचार - आमदार किशोर जोरगेवार

News Image

लालपेठ येथील असंख्य युवकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेला अंत्योदयाचा मंत्र, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे राष्ट्रप्रेम आणि असंख्य कार्यकर्त्यांचे समर्पण या पायावर भारतीय जनता पक्ष उभा असून भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून राष्ट्रसेवा, जनसेवा आणि विकास यांना सर्वोच्च प्राधान्य देणारा एक विचार आहे. हाच विचार पक्षात नव्याने सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी समाजासमोर न्यावा, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

गुरुवारी लालपेठ येथे भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, महामंत्री मनोज पाल, श्याम कनकम, सविता दंढारे, नामदेव डाहुले, दशरथसिंह ठाकूर, बलराम डोडाणी, आशिष मासिरकर, राम जंगम, गिरीश गोगुलवार, देवा कुंटा आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, आज लालपेठ परिसरात आयोजित करण्यात आलेला हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पाहून अत्यंत आनंद होत आहे.

मोठ्या संख्येने युवकांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे. ही केवळ पक्षाची ताकद नसून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायी बाब आहे.आज देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगात नवी उंची गाठत आहे. गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत यांसारख्या अनेक योजनांमुळे देशातील प्रत्येक नागरिक विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहे.

तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विकासाला नवी गती मिळाली आहे. सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय, पारदर्शक प्रशासन आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे जनतेचा भारतीय जनता पक्षावरील विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे.आज जे युवक पक्षात प्रवेश करत आहेत, त्यांनी केवळ राजकारणासाठी नव्हे तर समाजकारणासाठी, राष्ट्रनिर्मितीसाठी आणि जनसेवेसाठी हा निर्णय घेतला आहे.

 तुमच्या रूपाने भारतीय जनता पक्षाला नवी ऊर्जा, नवे विचार आणि नवे नेतृत्व मिळणार आहे.चंद्रपूर शहराच्या विकासासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे कार्य करत आहोत. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, क्रीडा आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी अनेक विकासकामे सुरू आहेत.

आगामी काळातही चंद्रपूरला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे.आपण सर्वांनी पक्षाची विचारधारा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचवण्यासाठी कार्य करावे आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.यानंतर पक्षाचा दुपट्टा परिधान करून सर्व नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.