The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी जीएमसी मध्ये रक्तदान सप्ताह.

News Image

अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी व जवानांचा सहभाग.

नागरिक व सामाजिक संघटनांना रक्तदान करण्याचे आवाहन.

चंद्रपूर, दि. 12 : जिल्ह्यातील रक्ताचा वाढता तुटवडा लक्षात घेता स्थानिक कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC) येथे रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्जरी विभाग, पदव्युत्तर विद्यार्थ्यांची मार्ड संघटना आणि सर्जन्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 11 जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

शासकीय रक्तकेंद्राच्या माहितीनुसार, सन 2025 मध्ये 15 हजार 258 रक्तपिशव्यांचे संकलन झाले होते. मात्र चालू वर्षात आतापर्यंत केवळ 5 हजार 102 रक्तपिशव्यांचे संकलन झाल्याने रुग्णालयात रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गरजू रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने रक्तसंकलन वाढविण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

राष्ट्रीय सर्जन सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित शिबिराचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्जन्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन सरदेशपांडे, महाराष्ट्र सर्जन असोसिएशनचे कोषाध्यक्ष डॉ. संजय घाटे, सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. मयुर बंडावर आणि ज्येष्ठ सर्जन डॉ. मंगेश टिपणीस उपस्थित होते.

रक्तदान सप्ताहांतर्गत 12 जून रोजी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, 13 जून रोजी पदवीपूर्व विद्यार्थी आणि 15 जून रोजी महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तकेंद्र प्रमुख डॉ. अमित प्रेमचंद, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. स्वाती देरकर, डॉ. मिलिंद झाडे, राकेश शेंडे तसेच मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. मयुर सदवाणी व सचिव डॉ. शोएब शेख यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले.

यावेळी अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी, चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती आणि तरुण रक्तदात्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी स्वतःहून रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे तसेच स्वेच्छेने रक्तदान करून शासकीय रक्तकेंद्रातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यास सहकार्य करावे.  शासकीय रक्तकेंद्रात उपलब्ध होणाऱ्या रक्तपिशव्या गरजू रुग्णांना विनामूल्य दिल्या जात असल्याने रक्तदानाद्वारे समाजहितासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ✍🏻 श्री. बंडु पांडुरंग पहानपटे

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.