The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

एनडीएच्या बिहार विजयाचा चंद्रपुरात जल्लोष..! भाजयुमो तर्फे भव्य रॅलीसह लाडु वाटप.

News Image

 

चंद्रपूर,(का. प्र.) : बिहार मधील दणदणीत विजयानंतर चंद्रपुरात मोठ्या जल्लोषात विजय रॅली काढण्यात आली.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मागील निवडणुकीपेक्षा सरस कामगिरी करीत 243 पैकी 200 पेक्षा जास्त जागा जिंकून भव्य विजय साकार केला. या निवडणुकीत मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यातील भाजपा नेतृत्वावर प्रचंड विश्वास व्यक्त करून तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा दणका दिला. विरोधकांना यावेळी पन्नाशीचा आकडा सुध्दा गाठता आला नाही. बिहारमधील या अभुतपूर्व विजयानंतर चंद्रपुर येथे भाजयुमो तर्फे भव्य विजय रॅली काढून जल्लोष करून लाडू वाटप करण्यात आले. विजय रॅली ला संबोधित करतांना चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार जी यांचे अभिनंदन करीत बिहार मधील जनतेचे आभार मानले. विजय रॅलीत आमदार किशोर जोरगेवार यांचेसह सुभाष कासनगोट्टूवार जिल्हाध्यक्ष, भाजपा चंद्रपूर महानगर, रघुवीर अहीर उपाध्यक्ष भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश, दशरथसिंग ठाकूर, वंदना हातगावकर, विनोद शेरकी, मनोज पाल, पूनम तिवारी, प्रदिप किरमे, सुभाष आदमाने, स्वप्निल डुकरे, गौतम यादव, राहुल सुर्यवंशी, सुदामा यादव, उग्रेसेंन पांडे, मुग्धा खाडे, गणेश गेडाम, मयुर भोकरे, पराग मलोडे, सुबोध चिकटे भाजपा भाजयुमोचे महानगरातील अनेक पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.