The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

हत्तीरोग निर्मूलनासाठी सर्वांनी औषधांचे सेवन करा !आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन.

News Image

चंद्रपूर :  जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या हत्तीरोग निर्मूलनाच्या सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेत सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा आणि आरोग्य विभागाकडून दिली जाणारी औषधे वेळेवर सेवन करावीत, असे आवाहन राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत राष्ट्रीय हत्तीरोग दूरिकरण कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात १० ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येत आहे.ही मोहीम हत्तीरोग निर्मूलनासाठी अत्यंत महत्त्वाची असून, दोन वर्षांखालील बालके, गर्भवती माता व गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्ती वगळता सर्व पात्र नागरिकांना प्रतिबंधात्मक औषधे देण्यात येणार आहेत. ही औषधे सुरक्षित व प्रभावी असून, रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी नागरिकांनी न चुकता सेवन करणे आवश्यक आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिक, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक यंत्रणांनी या मोहिमेत सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. तसेच आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच गोळ्यांचे सेवन करावे आणि त्या उपाशीपोटी घेऊ नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक घरापर्यंत पोहोचणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून औषधांचे सेवन करावे, असे त्यांनी सांगितले. हत्तीरोगमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांनी एकत्रितपणे या मोहिमेला यशस्वी करावे, असेही आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.