The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

महाशिवरात्री कार्यक्रमस्थळी आमदार किशोर जोरगेवार यांची व्यवस्थेची पाहणी.

News Image

महाशिवरात्री निमित्त महाराष्ट्रातील सर्वात विशाल महाशिवलिंग स्थळी आयोजित करण्यात येणार्या भव्य धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी आज कार्यक्रमस्थळी भेट देत सुरू असलेल्या तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मनपा अधिकारी, वेकोली प्रशासनातील अधिकारी आणि मंदिर कमेटीच्या सदस्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी विविध समित्यांमार्फत अंतिम तयारी सुरू आहे. यावेळी आमदार जोरगेवार यांनी मंडप उभारणी, दर्शन रांग व्यवस्था, वाहतूक नियोजन, पार्किंग सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छता व्यवस्था, प्रकाशयोजना तसेच सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.

 १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळपासून रुद्राभिषेक पूजा, महाआरती, शिव-पार्वती विवाह सोहळा, भजन संध्या व प्रसाद वितरण असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून १६ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बाहेरगावाहून येणार्या भाविकांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देणे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करणे तसेच सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये, याबाबत संबंधितांना सूचनाही देण्यात आल्या. कार्यक्रम भक्तिभावाने, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.