The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आरसीईआरटी, चंद्रपूर येथे विद्युत विभागा तर्फे आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा समारोप उत्साहात.

News Image
चंद्रपूर : सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत ISTE च्या सहकार्याने दि. २३ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित “Interdisciplinary Applications of Electrical Engineering in Smart and Sustainable Technologies (IAEESST-26)” या विषयावरील पाच दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समारोप सत्रात  मार्गदर्शन  करताना प्राचार्य डाॅ. अनिल चिताडे यांनी सांगितले की, विद्युत अभियांत्रिकी ही आधुनिक सभ्यतेचा कणा असून, शाश्वततेच्या दृष्टीकोनातून तिची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरते. शिक्षकांचे कर्तव्य केवळ सूत्रे व सिद्धांत शिकविणे नसून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, नवोपक्रम आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणे आहे. शिक्षक स्वतःला अद्ययावत करत राहिल्यास विद्यार्थीही आपोआप प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतात, असे प्रतिपादन करण्यात आले. समारोपावेळी  कार्यक्रमाचे संयोजक डॉ. आर. के. धात्रक, यांनी सांगितले की, हा कार्यक्रम केवळ व्याख्याने व सादरीकरणांपुरता मर्यादित न रहाता तो एक परिवर्तनाचा प्रवास व्हावा. पारंपरिक विद्युत अभियांत्रिकीच्या चौकटीपलीकडे जाऊन स्मार्ट ग्रिड, नवीकरणीय ऊर्जा, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि शाश्वत विकासातील या शाखेची भूमिका अधिक व्यापकपणे समजून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून करावा. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) अंतर्गत परिणामाधारित शिक्षण (Outcome Based Education), बहुविषयक अध्ययन व उद्योग-संस्थांमधील समन्वय यावर विशेष भर देण्यात आला. या एफडीपीमध्ये नवीकरणीय ऊर्जा, स्मार्ट ग्रिड, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, ऊर्जा कार्यक्षमता, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंडस्ट्रियल ऑटोमेशन, ग्रीन एनर्जी तसेच पॉवर इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. अशा दर्जेदार आणि प्रभावी एफडीपीमुळे संस्थेची शैक्षणिक ताकद अधोरेखित होते, असे मत  प्राचार्यांनी व्यक्त केले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या “Excellence is a continuous process and not an accident” या विचाराचा सुध्दा त्यांनी उल्लेख करत, उत्कृष्टतेच्या दिशेने हा कार्यक्रम एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगण्यात आले. हा कार्यक्रम केवळ समाप्ती नसून पुढील सहकार्य, संशोधन, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि शाश्वत तांत्रिक उपाययोजनांची सुरुवात ठरावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. समारोपावेळी  समन्वयक डॉ. एस. वाय. कामडी यांनी संपूर्ण प्रोग्रामची समारोपिय टिप्पनी  केली. तसेच समन्वयक प्रो. अमित आक्केवार यांनी आभार प्रदर्शन करतांना आयोजन समितीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी मदत करणाऱ्या आभार मानले. ISTE संस्थेच्या सहकार्याबद्दल विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका श्रीदेवी आक्केवार यांनी केले.
 
pro Rcert chandrapur 

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.