The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

एकात्म मानववादाचा दीप सदैव प्रज्वलित राहील – आमदार किशोर जोरगेवार.

News Image

पंडित दीनदयाल उपाध्याय पुण्यतिथीनिमित्त जनसंपर्क कार्यालयात अभिवादन.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी महानगराच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, मनपा गट नेते चंद्रशेखर शेट्टी, महामंत्री सविता दंढारे, महिला महामंत्री सायली येरणे, विधानसभा महिला अध्यक्ष वंदना हातगावकर, नगर सेविका अॅड. सारिका संदुरकर, नगर सेवक रॉबिन बिश्वास, प्रविण गिलबिले, मंजुशा कासनगोट्टूवार, प्रलय मशाखेतरी, ताहिर हुसेन, शंकर दंतुलवार यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला एकात्म मानववाद हा विचार आजही समाजजीवनाला दिशा देणारा आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करून सर्वसमावेशक विकास साधणे, ही त्यांची भूमिका आजच्या काळात अधिकच महत्त्वाची ठरते.

ते पुढे म्हणाले, राष्ट्रनिष्ठा, साधेपणा आणि समर्पित कार्यशैली यांचा आदर्श पंडितजींनी आपल्या आयुष्यातून घालून दिला. त्यांच्या विचारसरणीने भारतीय राजकारणाला नवी दिशा दिली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करत, त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प आपण केला पाहिजे असे ते म्हणाले. या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव करत आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमात भाजपा महानगरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.