The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार बुरकोनी (हिंगणघाट) येथे अभ्यासिकेचे लोकार्पण दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे आयोजन.

News Image

बुरकोनी (ता.हिंगणघाट जि. वर्धा) येथील ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आधुनिक व सुसज्ज अभ्यासिका.

चंद्रपूर - नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत शासकीय जागेवर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बुरकोनी (ता. हिंगणघाट, जि. वर्धा) येथे आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यासिकेचे उद्घाटन राज्याचे माजी अर्थ, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते होणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि नियमित अभ्यासासाठी शांत, सुसज्ज व प्रेरणादायी वातावरण उपलब्ध व्हावे या उद्देशाने ७० लाख रुपयाची ही अभ्यासिका साकारण्यात आली आहे. आधुनिक सुविधा, अभ्यासासाठी पोषक रचना आणि विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन उभारलेली ही अभ्यासिका शिक्षण क्षेत्रात मोलाची भर घालणारी ठरणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री मा. ना. डॉ. पंकज भोयर उपस्थित राहणार आहेत. या लोकार्पण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अमर काळे, हिंगणघाट विधानसभेचे आमदार समीर कुणावार, आर्वी विधानसभेचे आमदार सुमित वानखेडे, देवळी मतदार संघाचे आमदार राजेश बकाने, आमदार दादाराव केचे, आमदार सुधाकर अडबाले, आमदार अभिजित वंजारी, माजी खासदार रामदास तडस, माजी आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी, विविध पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक तसेच शिक्षण, सामाजिक व सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

 शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल निश्चितच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून या लोकार्पण सोहळ्यास नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन बुरकोनी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.