The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

पोंभुर्णा नगरपंचायत समिती सभापती पदांवर बिनविरोध निवड; विकासाला मिळणार नवी गती.

News Image

आरोग्य, शिक्षण व महिला-बालकल्याण समित्यांवर सभापतींची निवड.

 आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन.   पोंभुर्णा : पोंभुर्णा नगरपंचायत सभागृहात विविध समित्यांच्या सभापती पदांची निवडणूक दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडली असून सर्व पदांवर बिनविरोध निवड होऊन नगरविकासाला नवी दिशा मिळाली आहे. याबद्दल नवनियुक्त सभापतींचे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहे. आरोग्य, स्वच्छता व पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी दर्शन गजानन गोरंटीवार, शिक्षण, सांस्कृतिक व क्रीडा समितीच्या सभापतीपदी लक्ष्मण उद्धव कोडापे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. नंदाताई ऋषी कोटरंगे तर उपसभापतीपदी सौ. उषाताई सदाशिव गोरंतवार यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीत सर्व समिती सदस्य पदांसाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्यामुळे सर्व निवड बिनविरोध पार पडले. नवनियुक्त सभापतींचे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक करून अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहे. त्यांनी पोंभुर्णा नगरपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,नगराध्यक्षा सुलभाताई पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, संघटन प्रभारी राम लाखिया, भाजपा तालुका अध्यक्ष हरीश ढवस, राहुल संतोषवार, ऋषी कोटरंगे, ईश्वर नैताम, गुरुदास पिपरे, मोहन चलाख, राजू ठाकरे तसेच नगरसेविका श्र्वेता वनकर, आकाशी गेडाम, रोहिणीताई ढोले, शारदाताई गुरनुले आणि नगरसेवक महेश रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.