The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज.

News Image

तीन टप्प्यांत उपाययोजनांचे नियोजन.

जलजीवन मिशनच्या 59 योजनांना वीजजोडणी मिळणार.

चंद्रपूर, दि. 12 : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत 30.43 टक्के कमी पाऊस झाल्याने 12 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेमार्फत ऑक्टोबर 2026 ते जून 2027 या कालावधीसाठी तीन टप्प्यांत पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांच्या समन्वयातून पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे.

1238 गावांसाठी तीन टप्प्यांत पाणीटंचाई निवारण आराखडा : जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये एकूण 56 पाणलोट क्षेत्रे आणि 1751 गावे आहेत. त्यापैकी 42 पाणलोट क्षेत्रांतील 1238 गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये प्राधान्याने अधिक पाणीक्षमता असलेल्या कूपनलिका व विंधन विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासोबतच नियमित पाणीटंचाई भासणाऱ्या गावांमध्ये जलसंवर्धनाच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पाणीटंचाई निवारणाच्या दहा प्रकारच्या उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत.

विंधन विहिरी, कूपनलिका व नळ योजनांच्या दुरुस्तीला प्राधान्य : सन 2025-26 च्या पाणीटंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत 151 गावांमध्ये 188 विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच 48 गावांमध्ये 60 कूपनलिकांची कामे पूर्ण झाली आहेत. नळ पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्तीअंतर्गत 56 गावांतील कामे पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. उर्वरित 114 कामे प्रगतीपथावर असून ऑक्टोबरअखेर ती पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन आहे.

याशिवाय 8 गावांमध्ये 19 हातपंपांची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. तसेच 74 गावांमध्ये 79 विहिरींचे खोलीकरण व गाळ काढण्याची कामे पूर्ण झाली आहेत. 17 गावांमध्ये 24 खासगी विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

जलजीवन मिशनच्या 59 योजना फेब्रुवारीपर्यंत सुरू करण्याचे नियोजन : ग्रामीण भागातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत स्रोतांची कामे पूर्ण झालेल्या 59 योजनांना फेब्रुवारी 2027 पर्यंत विद्युत जोडणी देऊन कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. एप्रिल 2025 ते सप्टेंबर 2026 या कालावधीत जलजीवन मिशनच्या 82 पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 33 प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू ठेवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.

108 पाणीपुरवठा योजनांचा दर पंधरा दिवसांनी आढावा : जिल्ह्यातील भूपृष्ठीय जलस्रोतांवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू राहाव्यात, यासाठी पाण्याच्या उपलब्धतेचा नियमित आढावा घेण्यात येत आहे. पैनगंगा, गाडवी, उमा, अंधारी तसेच वर्धा आणि वैनगंगा या जलस्रोतांशी संबंधित एकूण 108 योजनांचा दर 15 दिवसांनी आढावा घेण्यात येत असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपत्रे यांनी सांगितले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान.🔔दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज.🔔अनधिकृत पाणी उपशाविरोधात होणार कठोर कारवाई.🔔काँग्रेसचे अभिजित वंजारी यांचा वर्धा जिल्ह्यात पदाधिकारी व पदवीधर मतदारांशी संवाद.🔔पदवीधरांच्या प्रश्नांची सोडवणूक हेच माझे प्राधान्य : ॲड. अभिजित वंजारी.🔔ब्रह्मपुरी, जिवती व बल्लारपूर तालुक्यांत प्रमुख पाच पिकांचे 20 टक्के सर्वेक्षण करण्याचे निर्देश.🔔विसापूर येथे अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेत 8 हजार उमेदवारांचा सहभाग. 17 ऑक्टोबरपर्यंत चालणार भरती प्रक्रिया.🔔अवैध रेती वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची धडक कारवाई... 40 लाखांचा 16 चक्का पल्ला गाडी व 10 ब्रास रेती जप्त.