The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींमध्ये 35 हजार केशर आंबा लागवड.

News Image

भेंडवी (ता.राजुरा) येथे जिल्हाधिका-यांच्या हस्ते आंब्याचे कलम लावून शुभारंभ.

चंद्रपूर, दि. 10 : चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच हरित आच्छादन वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. ‘विकसीत भारत ग्रामीण रोजगार व आजिविका हमी योजना’ (व्हीबीजी-राम-जी) आणि जिल्हा खनीकर्म प्रतिष्ठान निधीच्या अभिसरणातून जिल्ह्यातील तब्बल 50 ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी  केशर आंब्याची लागवड करण्यात आली. राजुरा तालुक्यातील भेंडवी येथे शुक्रवारी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केशर आंब्याचे कलम लावून जिल्हास्तरीय शुभारंभ केला.

जिल्हाधिकारी वसुमना पंत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून सर्व विभागप्रमुखांनी  प्रत्यक्ष वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थिती लावून केशर आंब्याची लागवड केली.

कोकण कृषी विद्यापीठाकडून 35 हजार दर्जेदार कलमे : या मोहिमेसाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून खास 35 हजार उच्च दर्जाची केशर आंबा कलमे मागवण्यात आली. आंबा कलमांची लागवड शास्त्रीय पद्धतीने व्हावी, यासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अमोल दडमल यांनी स्वतः चंद्रपुरात उपस्थित राहून ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींना व कर्मचाऱ्यांना आंबा लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन आणि संगोपनाबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले.

दुष्काळ निवारणासाठी श्रमदानातून वनराई बंधारा : केवळ वृक्षारोपणावर न थांबता जलसंधारणाची सांगड घालण्यासाठी राजुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भागवत रजेवाड यांच्या आवाहनावरून पंचायत समितीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त श्रमदान केले. या श्रमदानातून दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनेचा भाग म्हणून कार्यक्रमस्थळी वनराई बंधारा उभारण्यात आला, ज्यामुळे भूजल पातळी वाढून लागवड केलेल्या कलमांनाही लाभ होणार आहे.

यावेळी व्हीबीजी-राम-जी प्रकल्पाचे उपजिल्हा समन्वयक गिरीश धायगुडे, राजुराचे तहसीलदार ओमप्रकाश गोंड, गटविकास अधिकारी भागवत रजेवाड, कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अमोल दडमल, कृषी अधिकारी महेश वट्टी, सहायक प्रकल्प अधिकारी हेमंत येरमे यांच्यासह भेंडवीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔अवैध रेती वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची धडक कारवाई... 40 लाखांचा 16 चक्का पल्ला गाडी व 10 ब्रास रेती जप्त.🔔गोंदिया जिल्ह्यात अभिजित वंजारी यांचा दौरा; शिक्षक, पदवीधरांच्या प्रश्नांवर चर्चा.🔔सेवा संकल्प अभियानांतर्गत पाटण व जिवती येथे 348 विद्यार्थ्यांची दंत व मुख आरोग्य तपासणी.🔔‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानांतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी.🔔जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींमध्ये 35 हजार केशर आंबा लागवड.🔔बल्लारपुरात काँग्रेस विजयाचा निर्धार; अभिजित वंजारी यांनी भरला पदाधिकाऱ्यांत जोश.🔔बल्लारपूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी.🔔‘सेवा संकल्प’ अंतर्गत सीईओ यांच्या विविध गावांना भेटी.