The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

गोंदिया जिल्ह्यात अभिजित वंजारी यांचा दौरा; शिक्षक, पदवीधरांच्या प्रश्नांवर चर्चा.

News Image

देवरी, अर्जुनी मोरगावसह विविध ठिकाणी आढावा बैठका.

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी निवडणूक नियोजनाबाबत संवाद.

गोंदिया, ता. १० : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी यांनी शनिवारी गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात मुरदोली, देवरी आणि अर्जुनी मोरगाव येथे विविध बैठका घेऊन शिक्षक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. शिक्षकांच्या समस्या, पदवीधरांचे प्रश्न, संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीच्या नियोजनावर यावेळी चर्चा करण्यात आली.

अभिजित वंजारी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट), विमाशि तसेच विविध शिक्षक व कर्मचारी संघटनांच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

मुरदोलीत शिक्षकांशी संवाद.

मुरदोली येथील शिवराम विद्यालयात आयोजित आढावा बैठकीत शिक्षकांच्या विविध समस्या, शैक्षणिक प्रश्न आणि त्यांच्या हक्कांसंदर्भात चर्चा करण्यात आली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेत शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने संवाद साधण्यात आला. या बैठकीला गोंदिया जिल्हाध्यक्ष अमर वराडे, प्राचार्य धनराज हुकरे, रूपचंद जांभुळकर, राजेश देशपांडे आणि सिताराम यांच्यासह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.

देवरीत निवडणूक नियोजनावर भर.

देवरी येथे झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणी, प्रचाराचे नियोजन आणि विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय केला. या बैठकीला अमर वराडे, कुलदीप गुप्ता, उषा सहारे, वंदना काळे आणि राजेश चांदेवार यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अर्जुनी मोरगावमध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी.

अर्जुनी मोरगाव येथेही महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत शिक्षक आणि पदवीधर मतदारांशी संपर्क वाढविणे, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक समन्वय मजबूत करणे आणि विविध प्रश्न प्रभावीपणे मांडणे यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

या बैठकीला माजी आमदार दिलीप बनसोड, शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष शैलेश जयस्वाल, घनश्याम धामट, मिथुन मेश्राम आणि रणजित गणवीर यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

जिल्ह्यातील संघटनात्मक समन्वयावर भर.

गोंदिया जिल्ह्यातील या दौऱ्याच्या माध्यमातून शिक्षक, पदवीधर, कर्मचारी संघटना आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने विविध घटकांमध्ये समन्वय राखणे, स्थानिक प्रश्न जाणून घेणे आणि संघटनात्मक पातळीवर नियोजन करणे यावर भर देण्यात आला. जिल्ह्यातील बैठका आणि पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या भेटींमुळे निवडणुकीच्या तयारीला गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔अवैध रेती वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची धडक कारवाई... 40 लाखांचा 16 चक्का पल्ला गाडी व 10 ब्रास रेती जप्त.🔔गोंदिया जिल्ह्यात अभिजित वंजारी यांचा दौरा; शिक्षक, पदवीधरांच्या प्रश्नांवर चर्चा.🔔सेवा संकल्प अभियानांतर्गत पाटण व जिवती येथे 348 विद्यार्थ्यांची दंत व मुख आरोग्य तपासणी.🔔‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानांतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी.🔔जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींमध्ये 35 हजार केशर आंबा लागवड.🔔बल्लारपुरात काँग्रेस विजयाचा निर्धार; अभिजित वंजारी यांनी भरला पदाधिकाऱ्यांत जोश.🔔बल्लारपूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी.🔔‘सेवा संकल्प’ अंतर्गत सीईओ यांच्या विविध गावांना भेटी.