Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
वर्धा, ता. ११ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ (विमाशि) यांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांनी आज (दि. ११) वर्धा जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पदवीधर मतदारांशी संवाद साधला.

या दौऱ्यादरम्यान पुलगाव, देवळी, सेलू आणि वर्धा येथे विविध बैठका व भेटीगाठी घेण्यात आल्या. पुलगाव येथील लक्ष्मी सेलिब्रेशन येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ॲड. वंजारी यांनी मागील सहा वर्षांत केलेल्या कामांची माहिती तालुक्यातील पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. पदवीधरांचे प्रश्न आणि त्यांच्या हक्कांसाठी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे राहून पक्षाला विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

देवळी येथील विठ्ठल-रुक्मिणी सभागृहात आयोजित कार्यक्रमात ॲड. अभिजित वंजारी यांनी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी, पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मागील सहा वर्षांत केलेल्या कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

यानंतर सेलू येथील माहेर मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. या दौऱ्याच्या निमित्ताने शिक्षक, कर्मचारी, पदवीधर तसेच महाविकास आघाडीशी संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा झाली. पदवीधर मतदारसंघातील प्रश्न, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि संघटनात्मक बाबींवर विचारविनिमय करण्याच्या दृष्टीने या भेटी महत्त्वपूर्ण ठरल्या.
माजी मंत्री रणजित कांबळे यांची सदिच्छा भेट.
वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांनी माजी मंत्री रणजित कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी निवडणुकीशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: